कुटीर रूग्णालयात योग शिबिर घेऊन रुग्णांना दिलासा देण्यासाठी नरारे सरांचे कार्य कौतुकास्पद-डाॅ.जी.यु.गुंजकर
करमाळा प्रतिनिधी करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांच्या मनोबलासाठी व उत्तम आरोग्यासाठी वेळोवेळी योग शिबिरे घेऊन रुग्णांकडून योगासने करून घेतले एवढेच नाही तर कोरोना कालावधीतही रुग्णालयात येऊन योग शिबिरे घेतल्याने योग शिक्षक व सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांचा सन्मान वैद्यकीय अधिक्षक डॉ.जी. यु. गुंजकर व डॉ.महेश अभंग यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य नरारे हे वेळोवेळी रुग्णालयात येऊन रुग्णांचे मनोबल वाढवत आहेत. शिवाय योगासनाचे प्रात्यक्षिक करून उत्तम आरोग्यासाठी रुग्णांना व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना योगाचे प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे योग दिनाचे औचित्य साधून प्राचार्य नरारे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड, पत्रकार राजेश गायकवाड, अलीम शेख तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
