दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं१ च्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश
करमाळा प्रतिनिधी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२३-२०२४ मध्ये दत्तकला आयडियल स्कूल ॲन्ड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं१ च्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले.१७ वर्षे वयोगट मुली १००मी. व २०० मी. रनिंग स्पर्धेत आर्या बाबर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी स्थान मिळविले.
१७ वर्षे वयोगट मुले २००मी. व ४०० मी. रनिंग स्पर्धेत गोविंद पाखरे या विद्यार्थ्यांने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी स्थान मिळविले. तसेच या विद्यार्थ्याने १००मी. रनिंग मध्ये तृतीय क्रमांक मिळविला ,१९ वर्षे वयोगट मुली २०० मीटर रनिंग स्पर्धेत दीक्षा कोडलिंगे या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक व प्रगती पाटिल या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी स्थान मिळविले.तसेच १९ वर्षे वयोगट १०० मीटर रनिंग दीक्षा कोडलिंगे व अविष्कार कानतोडे या दोन्ही विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळविला. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी एकूण पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
*या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.श्री.रामदास झोळ सर, उपाध्यक्ष श्री राणादादा सुर्यवंशी साहेब, सचिवा प्रा.सौ.माया झोळ मॅडम, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.श्री विशाल बाबर सर, स्कूल डायरेक्टर सौ.नंदा ताटे मॅडम, स्कूलचे प्राचार्य श्री.विजय मारकड सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.*
