करमाळाकृषीराजकीय

लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा यांनी केलेले विकास कामे प्रेरणादायी तालुक्यातील जनतेने त्यांच्या मुलांना बळ द्यावे- मा.आ.दिलीप सोपल               

करमाळा प्रतिनिधी लोकनेते स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांनी करमाळा तालुक्यात केलेली विकास कामे बघितल्यानंतर गडकिल्ल्यांचे शिलेदार आठवतात त्याप्रमाणेच मामाचे कार्य तालुक्यासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याची उतराई म्हणून रश्मी दीदी बागल दिग्विजय बागल यांना करमाळा तालुक्यातील जनतेने मायेची सावली देऊन राजकारणात बळ द्यावे असे मत बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांनी व्यक्त केले करमाळा येथे  माजी मंत्री स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त कृषी महोत्सव आणि आठवणीतील मामा या स्फूर्ती दालनाचा उद्घाटन सोहळा दिलीप सोपल यांच्या हस्ते संप्पन झाला त्यावेळी बोलत होते. सुरूवातीला स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी महोत्सव प्रदर्शनाचे उद्घघाटन ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले व आठवणीतील मामा दालनाचे उद्घघाटन दिलीप सोपल यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना दिलीपराव सोपल म्हणाले की १९९५ ला निवडणुकीला उभा राहण्यास विरोधी पक्षाकडून कोणी तयार नव्हते तिकीटाची मागणी काय असते ते माहीत नव्हते. विजयदादाच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्ली वारी केली होती अशावेळीस आपली उमेदवारी पक्षाकडून कापण्यात आली अशा परिस्थितीत दिगंबरराव बागल मामासह आम्ही अपक्ष लढलो आणि निवडून आलो त्यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापना झाली दहिगाव योजनेसाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याकडे मामाने पाठपुरावा करून ती योजना मंजूर करून घेतली मामाचे योगदान नक्कीच करमाळा तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे दुष्काळग्रस्त करमाळा तालुक्याला विकासाच्या वाटावर नेणारे मामा एक विकास पुरुष होते यावेळी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की करमाळ्यातील तालुक्याचे विकासासाठी आपले आयुष्यपणाला लावून हा काम करणारा नेता आपल्या तब्येतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचे अकाली जाण्याने करमाळा तालुक्याची मोठे नुकसान झाले आहे. करमाळा तालुक्याला विकासाच्या प्रक्रियेत आणून सुजलाम सुफलाम करणारे दिगंबरराव बागल मामा यांच्या मुलांना मायेची सावली देऊन बळ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते माजी  उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील महाराष्ट्र कृषी प्रदर्शन चे उपाध्यक्ष विजय कोलते प्राचार्य अशोक सावळे सर,विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजीराव बंडगर सर उपसभापती चिंतामणी दादा जगताप  विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर, गटविकास अधिकारी मनोज राऊत, माजी आमदार शामलताई बागल, आदिनाथ चेअरमन धनंजय डोंगरे, महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या संचालिका रश्मी दीदी बागल, मकाई चेअरमन दिग्विजय बागल,व्हॉइस चेअरमन बाळासाहेब पांढरे तात्यासाहेब मस्कर,कृषी बाजार समिती उपसभापती चिंतामणीदादा जगताप मुस्लिम समाजाचे अध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य एल बी पाटील सर उपप्राचार्य संभाजीराजे किर्दाकसर, यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे पाटील, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष केरू गव्हाणे नानासाहेब लोकरे, नगरसेवक,शौकत नालबंद, सचिन घोलप,अल्ताफ शेठ तांबोळी, मुकुंद कांबळे राजश्रीताई माने, सविता कांबळे जिल्हा दूध संघाचे माजी संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले,आदिनाथ कारखान्याचे  संचालक पांडुरंग जाधव, लक्ष्मण गोडगे दिलीप केकान, अर्जुन भोगे, दिनेश भांडवलकर,विजयभाऊ लावंड भागवत पाटील ,भारत साळुंखे,एडवोकेट दत्तात्रय सोनवणे     मकाईचे संचालक संतोष देशमुख, आशिष भैया गायकवाड,गोकुळ नलवडे,रामभाऊ हाके सचिन पिसाळ, बापू कदम , समिती संचालक अमोल झाकणे, देवा ढेरे,शशिकांत केकान,हरिचंद्र झिंजाडे प्रताप बरडे सर धनंजय ढेरे, रेवण निकत,संदीप खटके, दीपक पाटोळे, एडवोकेट अमर शिंगाडे ,विष्णू रणदिवे, गोरख अप्पा जगदाळे आदिनाथ मकाई चे सर्व संचालक बाजार समितीचे सर्व संचालक बागल गटाची सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची प्रास्ताविक स्वागताध्यक्ष मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले तर मामांच्या आठवणी जागवत विविध प्रसंग डोळयासमोर उभा करून मामांच्या कार्याची माहिती सांगणारे प्रभावी सूत्रसंचालन शेखर जोगळेकर यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल साप्ताहिक पवनपुत्रेचे संपादक दिनेश मडके तसेच काय सांगताचे संपादक अशोक मुरूमकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तलवारपट्टू संस्कृती कांबळेउत्कृष्ट शेतकरी तात्या मोरे शेळीपालक नितीन पांढरे यांचा लोकनेते दिगंबरराव बागल मामा कार्य गौरव पुरस्कार म्हणून सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा‌ शिवाजी बंडगर सर यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group