फिसरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हनुमंत रोकडे यांच्या निवडीबद्दल सावंतगटाच्यावतीने सत्कार
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील फिसरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हनुमंत रोकडे यांची निवड झाली आहे. बुधवारी (ता. ८) ही निवड झाली आहे. रोकडे हे आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक आहेत. निवड झाल्यानंतर सरपंच रोकडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगत गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
यावेळी, माजी सरपंच कांतीलाल रोकडे, माजी सैनिक पांडुरंग आवताडे, माजी उपसरपंच संदीप नेटके, प्रदीप दौड, उपसरपंच विजय आवताडे, सज्जन चाळक, सुमित अवताडे, सुनील दौड, औदूंबर रोकडे. झुंबरलाल पाटील, महादेव अवताडे, मोहन नेटके, घनशाम पाटील, महादेव काटे, रमेश दौड, अक्षय नेटके, अमृत रोकडे, सुनील काटे, शहाजी रोकडे, हरिभाऊ अवताडे, नवनाथ वाघ, दत्ता रोकडे, अनिल रोकडे, नाना गायकवाड, महेश रोकडे, सौरभ रोकडे, बालाजी रोकडे, नागेश रोकडे, उमेश रोकडे, गोरख रोकडे, शिवाजी रोकडे, विनोद रोकडे, तात्या रोकडे व सुभाष नेटके उपस्थित होते.
