श्री. मकाई कारखान्याचे शेतकऱ्यांचे ऊस बीलाची रक्कम मिळावी म्हणून तत्कालीन चेअरमन यांच्या घरावर दि. 29 फेब्रुवारी रोजी मोर्चा करमाळा बंद चे आवाहन तात्पुरते स्थगित
करमाळा प्रतिनिधी श्री. मकाई कारखान्याचे शेतकऱ्यांचे ऊस बीलाची रक्कम मिळावी म्हणून तत्कालीन चेअरमन यांच्या घरावर दि. 29 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मागील हंगामातील थकीत ऊस बिलासाठी 26 जानेवारी रोजी सामूहिक आत्मदहनाचे तीव्र आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मा. जिल्हाधिकारी, मा. तहसीलदार, मा. पोलीस उपविभागीय अधिकारी, मा. पोलीस निरीक्षक यांनी 31 जानेवारी रोजी मकाई कारखान्याचे बँकेत कर्ज मंजूरी नंतर शेतकऱ्यांचे थकीत ऊस बीलाची रक्कम देऊ आणि सरकारी वकील यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना ऊस बीलाची रक्कम मिळाली नाही. तसेच मार्गदर्शन ही मिळाले नाही कोणावरही कारवाई झाली नाही म्हणून पुन्हा दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी गुरूवारी सकाळी 11 वाजता पोथरे नाका, सावंत गल्ली येथून तत्कालीन चेअरमन यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच करमाळा बंद चे आवाहन तात्पुरते स्थगित केले आहे. यावेळी ॲड. राहुल सावंत, दशरथ आण्णा कांबळे, प्रा. रामदास झोळ सर, वामनदादा बदे, रवींद्र गोडगे, राजेश गायकवाड सर, शहाजीराजे माने, हरिदास मोरे, बाळासाहेब गायकवाड, गणेश वाळुंजकर व शेतकरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित केले आहे.
पंधरा महिने होऊनही अद्यापपर्यंत थकीत ऊस बीलाची रक्कम दिलेली नाही. वारंवार मागणी करूनही, आंदोलन होत असतानाही त्याचे गांभीर्य घेत नसल्यामुळे आंदोलन कर्ते शेतकरी आक्रमक झालेले दिसून येत आहेत .जोपर्यंत शेतकऱ्यांना ऊस बील मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार असल्याचे ॲड राहुल सावंत यांनी सांगितले आहे.
