सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी सक्षमपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावावी -जेष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे
करमाळा प्रतिनिधी सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ज्यावेळेस विरोधी पक्ष कमकुवत पडेल त्यावेळेस पत्रकारांनी विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे बजवावी, असे मत ज्येष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे यांनी व्यक्त केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनानिमित्त करमाळा तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे यांचा सत्कार पत्रकार संघाच्या वतीने विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, काँग्रेसचे सुनील सावंत, नागरिक संघटनेचे अध्यक्ष कन्हैलाला देवी, भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, दीपक चव्हाण, मनसेचे नाना मोरे उपस्थती होते. चिवटे म्हणाले, पूर्वी वृत्तपत्र हे एक सामाजिक चळवळ म्हणून चालविण्याची भावना वृत्तपत्र मालकांमध्ये होती. पण आता याचे व्यवसायीकरण झाले असून व्यवसाय जाहिरात व बातमी याचा मिलाफ करून पत्रकारांना बातमीदारी करावी लागत आहे. अशा परिस्थितीत सुद्धा अन्यायग्रस्त शेतकरी, सर्व सामान्य मजूर, पीडित महिला यांची बाजू पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून घेणे गरजेचे आहे.शोध पत्रकारिता ही खऱ्या अर्थाने पत्रकारांच्या कर्तुत्वाला उंची गाठून देणारी पत्रकारिता ठरते. त्यासाठी प्रत्येक पत्रकारांनी शोध पत्रकारितेसाठी आग्रह करून नवनवीन बाबी समाजापुढे आणणे गरजेचे आहे.यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ॲड. बाबूराव हिरडे म्हणाले, वयाच्या 82 व्या वर्षीसुद्धा पत्रकार चिवटे यांनी पत्रकारितेचे नाळ सोडलेली नाही. ही कौतुकाची बाब आहे.यावेळी नासीर कबीर, अशोक नरसाळे, अण्णा काळे, विशाल घोलप, सचिन जव्हेरी, दिनेश मडके, शंभूराजे फरतडे, अविनाश जोशी, सिद्धार्थ वाघमारे, नागेश शेंडगे, जयंत दळवी, सागर गायकवाड, अलीम शेख, अश्पाक सय्यद, दत्तात्रय पाखरे, अशोक मुरूमकर, सुनील भोसले, अण्णासाहेब सुपनर, लक्ष्मण भोसले, संजय शीलवंत, पिंटू पाटणे, प्रदीप देवी, राजुशेठ सोळंकी, संतोष दोशी, नरेंद्र ठाकूर उपस्थित होते.
