Monday, April 21, 2025
Latest:
करमाळा

भाजपा व्यापार आघाडीच्यावतीने करमाळा शहरात #धन्यवाद मोदीजी अभियान संपन्न

करमाळा प्रतिनिधी
अंत्योदयाचं उद्दिष्ट ठेवत देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ तब्बल ६ कोटींपेक्षा अधिकांना मिळाला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा व्यापार आघाडी प्रदेशाध्यक्ष मा.श्री.विनोद कांकाणी आणि सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष मा.श्री.सचिन कल्यानशेट्टी यांच्या नेतृत्वात “धन्यवाद मोदीजी” ही संकल्पना २ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२२ या काळात राबवत आहे.
मा. मोदीजींनी जनतेसाठी केलेल्या कल्याणकारी कामांची पोहोच म्हणून करमाळा शहर भाजपा व्यापार आघाडी वतीने शहरातील विविध घटकांच्या भेटीगाठी घेऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना भेटून आढावा घेतला आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आभार पत्र लिहून दिले.

यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे,तालुका सरचिटणीस सुहास घोलप,शाम सिंधी,फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष आणि माजी शहराध्यक्ष संजय घोरपडे,चंदू राखुंडे,संजय गांधी योजना चे नरेंद्र ठाकुर,महिला मोर्चा आघाडीच्या संगीता ताई नष्टे,सहकार आघाडी चे सचिन चव्हाण,जितेश कांबळे सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांचे आणि लाभार्थ्यांचे आभार व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group