मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*
करमाळा प्रतिनिधी – मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात १६६ जणांनी रक्तदान केले .
या शिबीराचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यातआले . याप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सोलापूर झोनचे प्रमुख प पू . इंद्रपाल सिंह नागपाल महाराज , करमाळा तालुक्याचे आमदार नारायण आबा पाटील , यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अतुल भाऊ पाटील तसेच दत्ता सरडे ,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप , नगराध्यक्ष संजय सावंत , नगरसेवक – स्वाती फंड व महादेव आण्णा फंड ,माजी जि प सदस्या राणीताई वारे , मदार चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर , महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी गौरव पफाळ , शिवसेना जिल्हा समन्वयक निलेश चांदगुडे , पत्रकार जयंत दळवी आदी मान्यवर उपास्थित होते .
यावेळी प पू . इंद्रपालसिंह नागपाल महाराज यांनी संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी होत असलेल्या आध्यात्मिक व समाज उपयोगी कार्याची माहिती दिली . करमाळा शाखेने आजपर्यंत ५३00 युनिट रक्तदान केले आहे
सर्व मान्यवरांनी जागतिक स्तरावर शांतता ,एकत्व ,प्रेम व मानवतेची शिकवण देत असलेल्या संत निरंकारी मंडळाच्या कार्याचे कौतूक केले .
निष्काम भावनेने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यांचा सन्मान पुस्तक व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला .
या शिबीरासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढी – दमाणी ब्लड बँक सोलापूर तसेच श्री रामभाई शहा रक्तपेढी बार्शी यांना रक्तसंकलन केले .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवादल अधिकारी रमेश वारे , भैरू वळेकर , वैशाली सरडे , विजया भुजबळ ‘ मुकुंद साळुंके , डॉ भाऊसाहेब सरडे , मनधीर शिंदे , आत्माराम वायकुळे ,बप्पा धडस , अंगद पडवळे , दत्तात्रय कोल्हे ,एकनाथ निमगीरे , सुनिल भोगे, राजेंद्र भुजबळ ,सर्व महिला व पुरुष सेवादल यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल शिंदे यांनी केले तर सर्व मान्यवरांचे व रक्तदात्यांचे आभार ब्रँचमुखी पोपट थोरात यांनी मानले .


