दत्तकला शिक्षण संस्थेत वार्षिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न
करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेत वार्षिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी मोठया उत्साहात संपन्न झाला.दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला ग्रुप ऑफ स्कूल च्या वतीने शैक्षणिक वर्षांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले या प्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक श्री रामदास झोळ सर,उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी साहेब, सचिव माया झोळ मॅडम,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. बाबर सर उपस्थीत होते. तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, दौंड तालुक्याचे पोलिस निरीक्षक श्री. चंद्रशेखर यादव साहेब, ए. पी. आय.श्री.बावकर साहेब उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून माता पालकांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी बोलताना दौंड शहराचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव साहेब यांनी मुलांना खडतर परिश्रमाशिवाय यश शक्य नाही हा कानमंत्र दिला . संस्थेच्या सचिव प्रा. सौ माया.झोळमॅडम यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. पालकांनी देखील संस्थे विषयी आपला चांगला अनुभव सांगितला.यामध्ये डॉक्टर निरुपा शहा मॅडम बारामती व इवरे गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात प्रा .रामदास झोळ यांनी शिक्षणाच्या विविध सोयी सवलती विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले.पालक प्रतिनिधी म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. शहा मॅडम यांनी, पालकांनी पाल्याशी सुसंवाद साधणे ही काळाची गरज आहे हा मोलाचा सल्ला दिला.
या कार्यक्रमास प्रमुख दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झोळ सर, उपाध्यक्ष राणा दादा सूर्यवंशी साहेब, सचिव माया झोळ मॅडम संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ.बाबर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन दत्तकला ग्रुप ऑफ स्कूलच्या डायरेक्टर नंदा ताटे मॅडम , s.s.c. विभागाच्या प्राचार्या यादव मॅडम यांनी केले होते….
