Friday, September 18, 2026
Latest:
Uncategorized

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची अकलूज येथे बैठक संपन्न* *भाजपाचे संघटनात्मक काम बूथ पातळीपर्यंत पोहोचवा; प्रत्येक अभियान प्रभावीपणे राबवा – पालकमंत्री जयकुमार गोरे

*

करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज येथील पाटीदार भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. नूतन जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रमजी पावसकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत विविध विषयांवर मनोगत व्यक्त केले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पक्षाची विचारधारा, केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना आणि पक्षाची विविध अभियानं तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. “संघटना जितकी मजबूत, तितका पक्ष अधिक सक्षम. प्रत्येक बूथवर सक्रिय कार्यकर्ता आणि प्रभावी जनसंपर्क हेच भाजपच्या यशाचे सूत्र आहे,” असे ते म्हणाले.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी “गाव तिथे शाखा, बूथ तिथे भाजपा” हे अभियान प्रभावीपणे राबवून प्रत्येक बूथवर भाजपाच्या शाखा स्थापन करण्याचे आवाहन केले. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांनाच जबाबदाऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पक्षात स्थान दिले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
माजी आमदार राम सातपुते यांनी युवकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत बूथ सक्षमीकरणासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले. पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रमजी पावसकर यांनी पक्षाच्या विविध अभियानांचा आढावा घेत संघटना अधिक गतिमान आणि सक्षम करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहन केले.
या बैठकीमध्ये सेवा संकल्प अभियान, सदस्य नोंदणी, पदवीधर मतदार नोंदणी, मन की बात तसेच आगामी संघटनात्मक कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी प्रदेश पातळीवरून प्राप्त झालेल्या राजकीय व सामाजिक अशा दोन महत्त्वपूर्ण प्रस्तावांना जिल्हा कार्यकारिणीने एकमताने मंजुरी दिली.
या बैठकीस माढ्याचे नेते रणजीत शिंदे, सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा परिषद गटनेत्या रश्मी बागल, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, राजकुमार पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत, प्रणव मालक परिचारक, ज्येष्ठ नेते प्रकाशबापू पाटील, बाबाराजे देशमुख, बी. वाय. राऊत, हनुमंतराव सूळ, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरजाताई बोबडे, जिल्हा सरचिटणीस सचिनजी शिंदे, मंडल अध्यक्ष सुजयसिंह माने-पाटील, दत्ताजी जाधव यांच्यासह सर्व मंडल अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!