कावळवाडी जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नाही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची झाली परवड तात्काळ शिक्षकाची नेमणुक करण्याची रामभाऊ हाकेंची मागणी
कावळवाडी प्रतिनिधी कावळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणाची मोठी गैरसोय निर्माण झाली असून या शाळेवर तात्काळ पूर्णवेळ शिक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी बागल गटाचे नेते मकाईचे साखर कारखान्याचे संचालक रामभाऊ हाके यांनी गटविकास अधिकारी गटशिक्षणाअधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी बोलताना सांगितले की जिल्हा परिषद शाळा कावडवाडी येथे पूर्ण वेळ शिक्षक कार्यरत होता पण गेल्या महिन्याभरापासून ते शिक्षक येत नाही याबाबत ते म्हणाले की त्या शिक्षकांनी पैसे देऊन आपल्या गावाकडे बदली करून घेतली आहे त्यामुळे सध्या शिक्षकांनाविना शाळा चालू असून विद्यार्थ्यांचे शिक्षणाची मोठ्या प्रमाणात परवड होत आहे. एक दिवस जिंतीचा एक दिवस भिलारवाडीचा शिक्षक शिकवण्यास येत आहे तो पण एक-दोन दिवसाच्या फरकाने येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे मोठे नुकसान होत असून याला प्रशासन जबाबदार आहे याबाबत तात्काळ शिक्षकाची नेमणूक न केल्यास आंदोलन करणार असल्याचे मकाईचे संचालक रामभाऊ हाके यांनी सांगितले आहे.
