Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासहकार

आदिनाथ साखर कारखान्याचे काम अंतिम टप्यात सभासदानी शेअर्स पुर्ण केल्यास आर्थिक अडसर दुर होऊन आदिनाथ १ डिसेंबरला सुरु होणार- डांगेसाहेब       

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ  सहकारी साखर कारखान्याच्या चालू करण्याच्या दृष्टिकोनातून 70 टक्के काम सध्या पूर्ण झाले असून 30 टक्के काम पैसे अभावी रखडले असून आदिनाथ चालू करण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे असे आव्हान डांगे साहेब डॉक्टर वसंत पुंडे यांनी केले आहे.आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा तालुक्याचे वैभव असून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे 30000 सभासद आहेत .प्रत्येक सभासदांनी आदिनाथ सहकारी कारखाना चालू करण्यासाठी योगदान देणे गरजेचे असून सध्याच्या परिस्थितीमध्ये आदिनाथ कारखाना चालू करण्यासाठी पैशाची अत्यंत गरज असून तीन ते चार कोटी रुपये जमा झाल्यास आदिनाथ कारखाना सुरू करण्यास सहकार्य होणार आहे. आतापर्यंंत पंचेचाळिस लाख रुपये जमा झाले आहे. त्याचबरोबर आदिनाथ चे जे सभासद आहे त्यांनी आपले अपूर्ण शेअर्स पूर्ण करून घ्यावीत येनाऱ्या निवडणुकीमध्ये हा अपूर्ण सभासदाला आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी या गोष्टीचा विचार करून आपले अपुर्ण शेअर्स पूर्ण करून घ्यावेत. आदिनाध सहकारी साखर कारखाना चालु करण्यासाठी ना .तानाजीराव सावंत यांनी मोठे सहकार्य केले असुन माजी आमदार नारायण आबा पाटील बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांचे सहकार्य मिळत आहे.दोन दिवसांमध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखाना बचाव समितीची बैठक घेण्यात येणार असून या बैठकीमध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी सभासद शेअर्स पूर्ण करणे याबरोबरच आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी जे लोक मदत निधी देणार आहेत त्यांची मदत जमा करून एक डिसेंबरला तरी कारखाना चालू करण्याचा मानस असल्याचे डांगेसाहेब यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group