ऊस दर संघर्ष समितीच्यावतीने ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी विहाळच्या भैरवनाथ साखर कारखान्यावर गेट बंद आंदोलन
विहाळ प्रतिनिधी
ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने भैरवनाथ साखर कारखान्यावर गेट बंद आंदोलन करण्यात आले आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य तानाजी सावंत यांनी ऊसदराची कोंडी फोडावी अशी मागणी ऊस दर संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले परंतु कारखान्याचे चेअरमन किंवा कार्यकारी संचालक हे न येता कारखान्यातील प्रशासकीय अधिकाऱ्याला पाठवून ऊस दर संघर्ष समितीची घोर निराशा केली नामदार तानाजी सावंत साहेब यांनी सोलापूर जिल्ह्याचे नेते असल्यामुळे ऊस दराची कोंडी फोडतील अशी आशा सर्व शेतकऱ्यांना होती परंतु त्यांनी घोर निराशा केल्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये व ऊस दरसंघर्ष समितीच्यातीव्र पडसाद उमटले शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण झाली सोलापूर ऊस दर संघर्ष समितीचे समन्वयक समाधान फाटे बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली भाऊ जवळेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर रयत क्रांतीचे प्रांतिक सदस्य अजय बागल रोहित क्रांतीचे जिल्हा संघटक राजकुमार सरडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर जगदाळे बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी बनकर बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष कल्याण कोकरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष आघाडी अमोल घुमरे स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा तालुकाध्यक्ष बापू फरतडे संभाजी रिटे,राजेंद्र बागल हजारो शेतकरी उपस्थित होते.
