गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्यावतीने सर्व रोगनिदान व रक्तदान शिबीर संपन्न
करमाळा प्रतिनिधी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करमाळा येथे गुरु प्रसाद मंगल कार्यालय येथे रक्तदान व सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक 28/ 10 /2021 रोजी करण्यात आले होते ,या कार्यक्रमाचे उद्घाटन अमोदशेठ संचेती माजी नगराध्यक्ष करमाळा नगरपालिका व डॉक्टर संजय कोग्रेकर यांच्या हस्ते करण्यात आले ,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण बोकन जिल्हा सरचिटणीस भाजपा हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून कलीम काझी सर ,डॉ. वसंत पुंडे ,डॉ.सादिक बागवान, डॉ. राम बिनवडे, डॉ. मोसिन पठाण, डॉ. सौ सुनीता दोशी, दीपक पाटणे, रवींद्र बरिदे, शेखर स्वामी, डी.जे पाखरे होते यावेळी डॉक्टर सुनीता दोशी, किरण बोकन यांनी मनोगत व्यक्त केले ,यावेळी दोशी म्हणाल्या की करमाळा शहरात व तालुक्यांमध्ये गणेश चिवटे यांचे राजकारणा सोबत समाजकारणा मध्ये मोठे योगदान आहे ,यामध्ये गरीब निराधार गरजू लोकांना दोन वेळचे जेवण असेल तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दररोज संध्याकाळी भात -भाजी असेल तसेच दरवर्षी वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन ते करत असतात ते करमाळा शहराचे खरेच जनसेवक म्हणून शोभतात
या शिबिरामध्ये 195 रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच यावेळी नेत्ररोग तपासणी व महिलांची सर्वरोग निदान तपासणी करण्यात आली,
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण बिनवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन वसीम सय्यद यांनी केले ,