तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा अशी मानवतेची शिकवण देऊन आत्मनिर्भर जीवन जगण्यासाठी नरेंद्राचार्य महाराजांच्या सांप्रदायाचे कार्य अनुकरणीय-प्राचार्य मिलिंद फंड सर
करमाळा प्रतिनिधी तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा अशी मानवतेची शिकवण देऊन आत्मनिर्भर जीवन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या नरेंद्र महाराजांच्या स्व स्वरूप सांप्रदायाचे कार्य अनुकरणीय असल्याचे मत विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर यांनी केले. जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा सेवा केंद्राचे अध्यक्ष नरेशकुमार माने यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत दोन लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप मिलिंद फंड सर यांच्या हस्ते करण्यात आले. नरेशकुमार माने यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुका सेवा समिती यांच्यावतीने केक कापून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाली की परोपकार करून दुसऱ्याचे जीवन सुखी संपन्न करण्यासाठी दानाचे महत्त्व आध्यात्मिक कार्याद्वारे करून खऱ्या अर्थाने लोक कल्याणीचे काम हा सांप्रदाय करत असल्याने या संप्रदायाचे भविष्य उज्वल असुन धर्म कार्यासाठी आपण यामध्ये सहभागी होऊन पाठबळ देणार असल्याचे प्राचार्य मिलिंद फंड सर यांनी सांगितले.
या कार्यक्रमास नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण चोरमले माजी तालुकाध्यक्ष दिनेश मडके, नंदकिशोर सरडे, आण्णासाहेब क्षिरसागर बाबासाहेब क्षिरसागर विशेष कार्यवाह संतोष हंडाळ, भाऊसाहेब पाटील, रोहन शिंदे, विक्रम शिंदे, नवनाथ भोसले, शिवाजी मारकड, ,जाधव काका उपस्थित होते.
