Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

करमाळा एसटी डेपो साठी नवीन दहा बस मिळणार -महेश चिवटे

करमाळा प्रतिनिधी
करमाळा बस स्थानक आगारासाठी नवीन दहा बस देण्याची आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी दिले आहेत.येत्या आठवड्याभरात या बसेस करमाळ्याला मिळतील अशी आशा आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.                                                                  वांद्रे येथील महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या विश्रामगृहावरप्रताप सरनाईक यांची जिल्हाप्रमुख चिवटे यांनी भेट घेतली  यावेळी रस्त्यात बंद पडलेल्या एसटी बाबत वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे दाखवली होती.यावेळी पहिल्या टप्प्यात येणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या बसेस पैकी 10 बसेस करमाळा डेपोला द्या असा सूचना प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.                                                              एसटी महामंडळाचे महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांना भ्रमणध्वनी वरून फोन करून करमाळा डेपो साठी दहा बसेस द्या अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.सपूर्ण महाराष्ट्रात खराब बसेस करमाळा डेपो मध्ये असून गेल्या वर्षी सहा गाड्यांची अपघात झाले आहेत प्रवाशांना सुख लागेल अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group