Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

दहावी, बारावी परीक्षा केंद्रासाठी घोषित केंद्र संचालक पर्यवेक्षक नियुक्ती रद्द करा -पुणे विभाग टीडीएफचे उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर

करमाळा प्रतिनिधी दहावी, बारावी परीक्षा केंद्रासाठी घोषित केंद्र संचालक पर्यवेक्षक नियुक्ती रद्द करा -पुणे विभाग टीडीएफचे उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक व परीक्षेशी संबंधित व्यक्तीची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य शाळा     उच्च माध्यमिक व्यक्तीची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/उच्च विद्यालयातील माध्यमिक शिक्षक व कर्मचा-यांमधून करण्याचा घेतलेला निर्णय रद्य करण्यात यावा या बाबत राज्य मंडळाने शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना संदर्भीय पत्रातील मुद्या क्र. ०२ नुसार परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिकविद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत.
त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक संबधीत व्यक्तीची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य शाळा / उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचा-यांमधून करण्या बाबतची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश राज्यातील सर्व विभागीय अध्यक्ष यांना दिले आहेत.
आजपर्यंत राज्यामध्ये सर्वच परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक (मुख्याध्यापक) यांनी आपल्याच केंद्रात राहन यशस्वीरित्या परीक्षा
पार पाडलेल्या आहेत. पण अचानक मंडळाने मुख्याध्यापकांवर गैरविश्वास दाखवून त्यांची केंद्रे बदलण्याचा निर्णय घेतला आहे ही गंभीर बाब आहे. शासनाने शालांत परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी या प्रक्रियेतील सहभागी सर्वंकष घटकांचा अभ्यास करून त्यांचे विरूद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोरपणे केली पाहिजे. मात्र मूळ कारणांचा शोध न घेता परीक्षा मंडळाने परीक्षेसाठी नियुक्त शिक्षक पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे.
शिवाय या निर्णयातून जणू शिक्षक पर्यवेक्षक हेच परीक्षेतील
कॉपी गैरप्रकारांस जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षपणे परिक्षा मंडळाकडून/शासनाकडून ध्वनित होत असल्याने शिक्षकांच्या सामाजिक प्रतिष्ठेस गालबोट लावण्याचा निंद्यप्रकार आहे.
सदर निर्णय रद्द न केल्यास संघटनेस या निर्णया विरुद्ध आंदोलन करावे लागेल व त्याची पुढील परिणामांची सर्वस्वी जबाबदारी शालांत परीक्षा मंडळाची राहील. अशा प्रकारचे पत्र शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांना महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे पुणे विभागाचे उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांनी  पाठवले आहे .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group