भाजप युवा मोर्चा करमाळा शहर उपाध्यक्षपदी फैजान शेख यांची निवड
करमाळा प्रतिनिधी भाजप युवा मोर्चा करमाळा शहर उपाध्यक्षपदी फैजान अल्लाउदिन शेख यांची निवड करण्यात आली आहे.भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रफुल्ल शिंदे यांनी निवड केली आहे.भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष युवा नेते शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली आहे.
फैजान शेख रईस इलेक्ट्रॉनिक्स चे मालक उद्योजक अल्लाउद्दीन शेख यांचे चिरंजीव आहे. फैजानला लहानपणापासूनच समाजसेवेची आवड व भारतीय जनता पार्टी मध्ये काम करण्याची विशेष आवड होती .त्याची काम करण्याची क्षमता आवड बघुन त्याला शहर उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष युवा नेते शंभूराजे जगताप शहराध्यक्ष प्रफुल शिंदे यांनी दिली असल्याने आनंदाचे वातावरण आहे.या निवडी नंतर फैजान यांनी सांगितले की आपण मला दिलेल्या पदाला न्याय देऊन भाजपाचे काम घराघरांत पोहचण्याचे कार्य करणार दिलेल्या संधीचे सोने करून दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
