केडगाव येथील शासकीय कुष्ठधामकरिता 3 कोटी 40 लाख रुपये निधी मंजूर -आमदार संजयमामा शिंदे
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केडगाव येथे जिल्हा नियोजन समिती 2022 -23 जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून शासकीय कुष्ठधाम सुधारणा करण्याकरिता आपण 3 कोटी 50 लाख रुपयांची मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केलेली होती . दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी महोदयांनी सदर केडगाव येथील शासकीय कुष्ठधाम करीता 3 कोटी 40 लाख 92 रुपयाची प्रशासकीय मान्यता प्रदान केली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
केडगाव येथील शासकीय कुष्ठधाम येथे किचन कट्टा, भोजन हॉल व ऑफिस बांधण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ सन 2022 – 23 महिला व बालविकास विभागाकडून (राखीव 3 टक्के निधीतून ) सदर निधी मंजूर झालेला आहे.
या निधी मधून केडगाव येथील शासकीय कुष्ठधाम येथे असलेल्या रुग्णांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
