Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसामाजिक

गजानन स्पोर्टर्स क्लबचा हर घर तिरंगा अभिनव उपक्रम शहरात झेंड्याचे वाटप घरावर झेंडा लावण्याचे केले आवाहन

करमाळा प्रतिनिधी हर घर तिरंगा या योजने अवचित साधून करमाळा येथे गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लब च्या वतीने शहरातील वेताळपेठ, कुंकू गल्ली, खाटीक गल्ली ,साठेनगर, डवरी गल्ली ,खडकपुरा ,तसेच मेन रोड ,राशीन पेठ, अशा अनेक ठिकाणी या मंडळाने तिरंगा झेंड्याचे वाटप केले असून प्रत्येक कुटुंबाने 13 ऑगस्ट पासून आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावा असे आव्हान केले मंडळाच्या सर्व सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी ह्या झेंडा वाटपासाठी कष्ट घेतले असून मंडळाचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर झेंडे वाटप झाले असून या कार्यक्रमाला समीर बागवान, चेतन ढाळे, अक्षय ढाळे ,कुणाल ढाळे अल्ताफ दारूवाले, मुदोतसर दारू वाले ,डॉक्टर गजेंद्र विभुते, इरशाद भाई शिकलकर , भावेश देवी,हर्षद शिकलकर ,प्रीतम शेठ बलदोटा, सुमित ढाळे, विशाल ढाळे , प्रशांत राजपुरे, शेखर गायकवाड, नागेश लोकरे,शुभम बोधे ,योगेश शेट सोरटे ,चिन्मय मोरे ,आशिष मंदलेचा , रोहिदास आलाट, जॉनटी पठाण , संतोष मंडलिक, तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश शेठ बलदोटा, विकास ढाळे, मनू भाई गांधी आदी जण उपस्थित होते तसेच मंडळाचे बाल सदस्यांनी झेंडे वाटप करण्यात सहभाग नोंदवला गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब हे सातत्याने सतत सामाजिक उपक्रम राबवत असते व तसेच इथून पुढेही असे सामाजिक उपक्रम राबवत राहणार असे मंडळाचे संस्थापक प्रशांत ढाळे यांनी आम्हास माहिती दिली…..

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group