करमाळाशैक्षणिकसकारात्मक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त समूह राष्ट्रगान व प्रभात फेरी संपन्न*

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव आयोजित 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव घरोघरी तिरंगा, उपक्रमांतर्गत शाळेत समूह राष्ट्रगान व गावात प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले होते प्रभात फेरीमध्ये विद्यार्थी शिक्षक पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता ही प्रभात फेरी शाळेपासून परिसरातील गावातून काढण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर घोषणा दिल्या तसेच घरोघरी तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन ही केले यावेळी नागरिकांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्यावेळी जिल्हा परिषद शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव येथील विद्यार्थ्यांनी *दारू सोडा व आपल्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळवा* चे फलक लावून पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली व हा उपक्रम संपन्न करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री रामहरी जाधवर सर बुधवंत सर खान सर कुलकर्णी सर चव्हाण सर पाटील मॅडम कानडे मॅडम व शिक्षक सहशिक्षका असे अनेक जणांनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील पालक वर्ग तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी माहिती संजय सरवदे यांनी दिली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!