करमाळा

सीमेवरील जवानांसाठी घारगावच्या आदर्श माजी सरपंच, तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. लक्ष्मी संजय सरवदे यांनी पाठविल्या राख्या*

करमाळा प्रतिनिधी सीमेवरील जवानांसाठी घारगावच्या आदर्श माजी सरपंच, तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. लक्ष्मी संजय सरवदे यांनी रक्षाबंधनानिम्मित राख्या पाठवल्या आहेत.
आज आपण बघतोय प्रत्येक सैनिक प्राणाची बाजी लावून आपले म्हणजे देशाचे रक्षण करीत आहेत त्याच भावनेतून प्रेरित होऊन देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना घारगावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या माजी सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांनी डॉक्टर नंदकिशोर रमाकांत एकबोटे पुणे यांच्या मार्गदर्शना खाली जवानांना राख्या पाठवण्यात आल्या.प्रत्येक सैनिक हा आपला भाऊ आहे आणि त्यासाठी आपलेही काही तरी कर्तव्य आहे या भावनेतून राख्या पाठवण्याचे आवाहन घारगाव च्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या तथा माजी सरपंच सौ लक्ष्मी सरवदे यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group