संगोबा व आवाटी येथे उद्या विविध विकास कामांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा .. आमदार संजयमामा शिंदे यांचे शुभ हस्ते व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार
करमाळा प्रतिनिधी
2019 ते 2024 या कालावधीत आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यासाठी जवळपास अडीच हजार कोटीहून अधिक निधी मंजूर करून आणला असून त्या कामांच्या उद्घाटनाची सुरुवात सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 पासून होत असून या दिवशी तीर्थक्षेत्र आदिनाथ महाराज संगोबा येथे सकाळी 10 वाजता रस्त्यांच्या व घाटाच्या विकास कामांचे भूमिपूजन करून होत आहे. तर 11.30 वाजता आवाटी येथे नवीन बांधलेल्या सबस्टेशनचा लोकार्पण सोहळा व रस्त्याचे भूमिपूजन , वली बाबा दर्गा वॉल कंपाऊंड चे भूमिपूजन आमदार संजयमामा शिंदे यांचे शुभ हस्ते व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
उद्या जवळपास 20 कोटी निधी मंजूर असलेल्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने करमाळा बोरगाव घारगाव ते जिल्हा रस्ता प्रजिमा 5 – 4 कोटी 50 लाख ,बोरगाव ते निलज रस्ता ग्रामा 81 – 2 कोटी,प्रधानमंत्री ग्रामसडक योजना रामा 68 ते सटवाई वस्ती निलज ते बिटरगाव श्री रस्ता – 3 कोटी 28 लाख ,पर्यटन विभाग – संगोबा घाट बांधणे – 90 लाख,आवाटी सबस्टेशन – लोकार्पण सोहळा – 4 कोटी ,आवाटी दर्गा वॉल कंपाऊंड भूमिपूजन – 99 लाख,गौंडरे फाटा ते नेरले रस्ता भूमिपूजन – 2 कोटी 85 लाख,फिसरे हिसरे हिवरे ते कोळगाव इजिमा 8 रस्ता – 2 कोटी या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या रस्ता कामांचे तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक व पर्यटन विभागाकडून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत आहे.
उद्या होणाऱ्या या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन निलज ,बोरगाव ,घारगाव ,तरडगाव ,बाळेवाडी, गौंडरे, नेरले, हिवरे ,आवाटी, कोळगाव ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
