दलकला शिक्षण संस्थेचे दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची NEET, JEE, CET परीक्षेत गरुड झेप
भिगवण प्रतिनिधी १७ आक्टोबर रोजी, दत्तकला शिक्षण संस्थेत गुणवंत विदयार्थ्याचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रा. श्री रामदास झोळ सर, संस्थेच्या सचिवा आदरणीय सौ. माया झोळ मॅडम उपस्थित होत्या. दत्तकला ग्रुप ऑफ स्कूलच्या डायरेक्टर सौ ताटे मॅडम,प्राचार्या सौ यादव मॅडम, इनचार्ज खाडे मॅडम, इनचार्ज धेंडे सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते
यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष झोळ सर यांनी विदयार्थ्यांना अनमोल माहिती दिली. यशाबरोबर अपयश पचवण्याची ताकद विदयार्थ्यांमध्ये असावी तसेच जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी विद्यार्थ्याकडे असेल तर नक्कीच त्यांना यश मिळेले. यावेळी बोलताना संस्थेच्या सचिवा माया झोळ मॅडम यांनी ‘विद्यार्थी हीच माझी खरी संपत्ती आहे, माझ्या संस्थेतील प्रत्येक विदयार्थी सर्वगुण -संपन्न असावा, आणि यशाच्या शिखरावर दिसावा’ असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हारके शार्दूल,गलांडे मानसी,नांचन वेदांत या विदयार्थ्यांनी शाळेचे व शाळेतील शिक्षक यांचे आभार मानले. पालक प्रतिनिधी म्हणून नाचन मॅडम, वाघ मॅडम, चौधर मॅडम यांनी शाळेचे खुप कौतुक केले.
नीट परीक्षेत यश मिळालेले विद्यार्थी खालीलप्रमाणे:- हारके शार्दूल आनंद – 685, राजपुत हर्ष प्रणेता 620, साबळे प्रज्योत अनिल 615, गलांडे मानसी श्रीपती 607, इंगोले अमृता 605, पाटील सार्थक 597, चौधर सिद्धेश 590, मांडन अश्विन प्रशांत 580, झरगड नभन्या केशवचंद्र 579, 8 वाघ निखिल 570, नाचन वेदांत 567, काळखैरे गौरी 553 (CET-99.7),श्वेता बर्गे 586, JEE मध्ये हिंगमिरे विश्वजीत 92%शिर्के सौरभ सुभाष याने JEE मध्ये 97.02 व CET मध्ये 99.04,ढाले प्रांजली अनिल 97.02% व CET 97%,कोडे हर्ष हर्षवर्धन 96% या सर्व विदयार्थ्यांचा गुणगौरव दत्तकला शिक्षण संस्थेच्या वतीने आदरणीय झोळ सर व मॅडम यांनी केला. कार्यक्रमाचे आभर वैष्णवी ढोले हिने केले.
