कृषी उत्पन्न बाजारसमितीचे माजी संचालक रामेश्वर पाटील यांचे निधन
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कै. रामेश्वर विष्णू पाटील रा. मांजरगाव वय 70 यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी निधन झाले. राजकारणात समाजकारणात अशा विविध क्षेत्रात नावाजलेले कै.साहेबराव विष्णू पाटील यांचे ते धाकटे बंधू होते. मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष साहेबराव पाटील त्यांचे चुलते अशा पाटील घराण्यातील नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणजेच रामेश्वर पाटील यांच्या जाण्याने समाजातून खूप हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगी दोन सुना नातंवडे असा परिवार आहे.
