भाजपाचे खासदारांचाच रेल्वे अधिकारी यांचेकडुन आवमान होत असेल तिथे सर्वसामान्यांचे काय?- ॲड. अजित विघ्ने
केत्तुर प्रतिनिधी
माढ्याचे भाजपाचे खासदार श्री. रणजित नाईक निंबाळकर यांनी रेल्वे बोर्डाचे सदस्यत्वाचा राजीनामा दिलेची बातमी पाहिली.. आम्हीही गेली अनेक वर्षापासुन रेल्वे विभागाकडे आमचे पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडयांना थांबा मिळणेबाबत प्रयत्नशिल असुन, सन-१९९६ साली रेल्वे रोको आंदोलन केले होते.. सध्याही मध्य रेल्वेचे दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून रेल्वे गेट बंद करून त्या ठिकाणी बोगद्याची कामे चालु आहेत, ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असुन, बोगद्यामधे प्रचंड पाणी साठत आहे, ड्रेनेज व्यवस्था नाही, निकृष्ट दर्जाचे सिमेंट कॉंक्रीटीकरण होत असुन, जिथे फ्लाय ओव्हर ब्रीज ची आवश्यकता आहे तिथे रेल्वेने नाहक बोगदयाला पसंती दिली आहे.. बोगदयाच्या दोन्ही बाजुकडील भिंतीना सिमेंट वॉल केलेले नाहीत… स्टेशनवरून नागरिकांना जाण्यायेण्या साठी स्वतंत्र पादचारी मार्ग दिलेला नाही.. स्टेशन आणि ऑफीसर्स कॉर्टस ची झालेली कामे देखिल निकृष्ठ दर्जाची झाली आहेत… विद्यमान खासदार साहेबांना आम्ही याबाबत बऱ्याचदा भेटलो परंतु त्यांचेकडुन आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, परंतु आज त्यांनीच रेल्वे बोर्ड सदस्याचा राजीनामा दिला यावरून सर्व सामान्यांना तर कधी न्याय मिळायचा अशी वस्तुस्थिती आहे..
