आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा डॉ रोहन पाटील यांच्या कडून शिवजयंती निमित्त जि प प्रा शाळा नीळवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण
करमाळा प्रतिनिधी आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा डॉ रोहन पाटील यांच्या कडून शिवजयंती निमित्त जि प प्रा शाळा नीळवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.19 फेब्रुवारी रोजी जि प प्रा शाळा नीळवस्ती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सुंदर अशी आपली मनोगते व्यक्त केली त्या सर्व विद्यार्थ्यांना आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा, डॉ रोहन पाटील यांच्या कडून सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला डॉ रोहन पाटील यांचे शाळा व्यवस्थापन समिती जि प प्रा शाळा नीळवस्ती व मुख्याध्यापक श्री तात्यासाहेब जाधव, श्री मनोज दराडे यांनी त्यांचे आभार मानले.
