केत्तुर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नुकताच जगद्गुगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा सत्संग शुभारंभ सोहळा संपन्न
केत्तूर प्रतिनिधी केत्तुर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नुकताच जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा सत्संग सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी माऊलीच्या नामस्मरणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पाद्य पूजन श्री व सौ उर्मिला राजाराम माने व श्री व सौ भाग्यश्री योगेश देवकते यांच्या शुभहस्ते पार पडले तर प्रतिमा पूजन श्री व सौ सत्यशीला अनिल खटके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रवचन सेवा सरिता भागवत (आळंदी ) यांची सत्संग सेवा पार पडली.जाडी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यदेव देवकते, नवनाथ राऊत, संजय गोसावी,अनिल खटके, दिनेश माने, मामा साळवे, पांडुरंग तरटे, विठ्ठल महामुनी यांनी परिश्रम घेतले.यावेळी मीना तरटे, राजश्री पाटील, मनीषा धुमाळ, शिवगंगा खैरे, मंदाकिनी गोसावी, सुरेखा खटके, आशा देवकते या महिलांनी विशेष सहकार्य केले. यावेळी करमाळा तालुक्यातील शेकडो भक्तगण उपस्थित होत शेवटी श्री व सौ मनीषा रामभाऊ धुमाळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली व त्यानंतर उपस्थित त्यांना महाप्रसाद देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली.यापुढे प्रत्येक रविवारी या ठिकाणी रविवारी 9 वाजता सत्संग आयोजित करण्यात आला आहे. याचा विशेष लाभ घ्यावा अशी आवाहन सेवा केंद्र समितीने केले आहे.
