Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

गजराज ड्रायक्लीनर्सचे मालक रावसाहेब सावरे यांचा प्रामाणिकपणा शेलगाव क चे सरपंच आत्माराम वीर यांचे 15000 रुपये केले परत


करमाळा प्रतिनिधी
शेलगाव क चे सरपंच आत्माराम गणपत वीर यांनी गजराज ड्रायक्लीनर्स येथे ड्रायक्लीन करण्यासाठी टाकलेल्या कपड्यांमध्ये चुकून 15000 रुपये गेले होते. हे 15 हजार रुपये त्यांना फोन करून प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल श्री सावरे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे. श्री सावरे यांनी आत्तापर्यंत त्यांच्या ड्रायक्लिनच्या दुकानांमध्ये ज्या ग्राहकांनी कपडे ड्रायक्लीन साठी पाठवली होती त्यांच्या कपड्यांच्या खिशामध्ये चुकून आलेले सोन्याचे दागिने ,रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे , मोबाईल इ. प्रामाणिकपणे परत केलेले आहेत.
चौकट –
सावरे यांनी आतापर्यंत परत केलेले दागिने आणि रोख रक्कम…
१) यश कल्याणी संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील यांचे अडीच तोळ्याचे लॉकेट आणि दीड तोळ्याची अंगठी
२) प्रदीप बलदोटा दीड तोळ्याचे लॉकेट
३) कोठारी मेन रोड एक तोळ्याची अंगठी
४) वांगडे कंडक्टर यांच्या मुलीच्या कानातल्या सोन्याच्या रिंगा
५) हिरडे वकील साहेब यांच्या पत्नीचे सोन्याचे कानातिल रिंगा
६) हिरडे वकील साहेब यांचे ड्रायव्हर त्यांच्या पत्नीचे दोन तोळ्याचे गंठण
७) जगताप सर राजुरी एप्पल मोबाइल
८) मनु गांधी मेन रोड यांच्या बाळाचे चांदीचे वाळे व मनगट्या
९) संतोष जाधव रोख रक्कम ४६०० रु
१०) भांडवलकर रोख रक्कम ४३००रु
११) अमोल पवार २५०००रु किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल
१२) चत्रभुज नारायण घाडगे राहणार अर्जुन नगर रोख रक्कम ८३८२ रु
१३) डॉक्टर श्रीराम परदेशी रोख रक्कम व महत्त्वाचे डॉक्युमेंट
१४) बालरोग तज्ञ करंजकर डॉक्टर रोख रक्कम १६००० रु
१५) आर जे पाटील करमाळा कॉन्ट्रॅक्टर रोख रक्कम ११००रु
१६) रणसिंग साहेब रोख रक्कम १०००रु
१७) आत्माराम गणपत वीर शेलगावचे (क) सरपंच रोख रक्कम १५००० रु
या सर्व ग्राहकांनी ड्रायक्लिनला टाकलेल्या कपड्यांच्या खिशा मध्ये आज पर्यंत मिळालेले रोख रक्कम,सोने,चांदी,मोबाईल,महत्त्वाचे डॉक्युमेंट हे त्यांना संपर्क करून परत करण्यात आले. गजराज ड्रायक्लीनर्सचे मालक रावसाहेब सावरे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group