ताज्या घडामोडी

आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी सर्व गुणसंपन्न असण्यासाठी शिक्षकांनी परिपूर्ण असणे गरजेचे-प्रा. रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी आजच्या स्पर्धेच्या युगात दत्तकला शिक्षण संस्थेतील विद्यार्थी सर्वगुण संपन्न असण्यासाठी शिक्षक परिपूर्ण असणे गरजेचे आहे अशी मदत करा शिक्षण संस्थेची संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी व्यक्त केले. त्यासाठी त्यांना व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणारा शिक्षक एक आदर्श शिक्षक असावा म्हणून दत्तकला शिक्षण संस्थेत व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम घेण्यात आला दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विद्याभूषण आदरणीय प्रा. श्री रामदास झोळ सर संस्थेचे उपाध्यक्ष शिस्तप्रिय श्री राणा दादा सूर्यवंशी साहेब संस्थेच्या सचिवा ध्येयवादी सौ.माया झोळ मॅडम तसेच दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदरणीय डॉक्टर श्री विशाल बाबर सर यांच्या संकल्पनेतून दत्तकला शिक्षण संस्थेत व्यक्तिमत्व विकास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दिनांक 9.9. 23 रोजी वार शनिवार या दिवशी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक सन्माननीय प्राध्यापक श्री झोळसर यांनीही शिक्षकांना आपल्या भाषणातून प्रत्येक शिक्षकांनी बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार स्वतःमध्ये संघटन कौशल्य स्थिर भाव कर्तुत्व वैचारिक पातळी बौद्धिक क्षमता अभिरुची या गुणांची वाढ करणे गरजेचे आहे हा अनमोल संदेश दिला व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षकांसाठी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या शिक्षण विभागाच्या डायरेक्टर डॉक्टर बोकील मॅडम यांनी शिक्षक कसा असावा त्याच्या कामात सातत्य असायला हवं तो स्वतःच प्रथम शिस्तप्रिय असला पाहिजे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्याने वेळेचे नियोजन केले पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांना शिकवत असताना प्रत्येक शिक्षकांनी शैक्षणिक साधनांचा वापर करणे गरजेचे आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचन आणि विद्यार्थ्यांना समजावून घेणे गरजेचे आहे हा सुंदर संदेश दिला तसेच पूर्वीची शिक्षण पद्धती व आजची नवीन शिक्षण पद्धती व शिक्षण पद्धतीत झालेला बदल दत्तकला शिक्षण संस्थेतील शेकडो शिक्षकांना सांगितला सर्व शिक्षकांना त्यांनी बचेंद्री पाल यांच्या वरती लिहिलेले एक सुंदर पुस्तक गिफ्ट म्हणून दिले त् त्यानंतर अल्पोपहार होऊन दत्तकला ग्रुप ऑफ स्कूलच्या डायरेक्टर सौ.नंदा ताटे मॅडम यांनी सन्माननीय बोकील मॅडम यांचे आभार मानले दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सौ.यादव मॅडम इन्चार्ज खाडे मॅडम इन्चार्ज धेंडे सर व मनी मॅडम रघुनाथ सर सर सर्व शिक्षक यांनी हा कार्यक्रम उत्साहात साजरा केला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group