Uncategorized

समाजकारणातून राजकारणाचा वसा जपुन जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करणारे औदुंबर राजे भोसले यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी-ॲड दत्तात्रय सोनवणे

करमाळा प्रतिनिधी  करमाळा प्रतिनिधी समाजकारणातून राजकारणात यशस्वी होऊन जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करणारे औदुंबर राजे भोसले यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे असे मत आदिनाथ कारखान्याचे‌ माजी संचालक ॲडवोकेट दत्तात्रय सोनवणे यांनी व्यक्त केले .        औदुंबरराजे भोसले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमास करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके सचिव नरेंद्र सिंह ठाकुर ‌ उपस्थित होते पुढे बोलताना ॲडव्होकेट दत्तात्रय सोनवणे म्हणाले की कुठलेही क्षेत्रामध्ये काम करत असताना कामाप्रती असलेली निष्ठा ,सातत्य माणुसकी धर्म पाळून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून निरपेक्षपणे निस्वार्थ भावनेने सेवा केल्यास जनसामान्याचा आपणास नक्कीच पाठिंबा मिळतो. नेरले गावचे सरपंच म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे. जनतेसाठी असणारा कळवळा त्यांची कामे करण्याची तळमळ ही कौतुकास्पद असून समाजकार्याचा वसा ‌ त्यांनी जपला आहे. औदुंबर राजेभोसले यांना मिळणारा जनसामान्यांचा पाठिंबा हे त्यांच्या केलेल्या चांगल्या कामाची पोहच पावती असून त्यांचा आदर्श घेऊन युवा पिढीने वाटचाल करावी कारण समाजकारण असो किंवा राजकारण तेथे कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही तुमचे कामच तुम्हाला जन माणसांमध्ये नेतृत्व सिद्ध करण्याची संधी देत असते तसेच सर्वसामान्य जनतेसाठी औदुंबर राजे भोसले यांनी कार्यरत राहून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!