Monday, July 6, 2026
Latest:
Uncategorized

महात्मा गांधी विद्यालयाचे सहशिक्षक संदीप पुजारी यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

 

करमाळा प्रतिनिधी: सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्था, सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार महात्मा गांधी विद्यालय, करमाळा येथील सहशिक्षक संदीप दादासाहेब पुजारी यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते पंढरपूर येथे संपन्न झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला.शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा, अध्यापनातील सातत्य, तसेच सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग याची दखल घेऊन संदीप पुजारी यांना हा सन्मान देण्यात आला. त्यांच्या या यशामुळे महात्मा गांधी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून करमाळा परिसरात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. संदीप पुजारी श्री कमलाभवानी दैवीचे पुजारी माजी सरपंच दादासाहेब पुजारी यांचे सुपुत्र आहेत.या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यालयाचे अध्यक्ष माजी आमदार जयवंतराव जगताप तसेच विश्वस्त वैभवराजे जगताप शंभूराजे जगताप मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच मित्रपरिवार यांनी संदीप पुजारीसर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!