सोलापूर जनता सहकारी बँकेच्या ४२ व्या शाखेचा गुरूवार १९ नोव्हेंबर रोजी करमाळ्यात शुभारंभ उद्घघाटन सोहळा नानासाहेब जाधव यांच्या हस्ते उद्घाटन, नगराध्यक्ष मोहिनी सावंत यांची प्रमुख उपस्थिती
करमाळा प्रतिनिधी
सहकार, विश्वास आणि आर्थिक प्रगतीचा वारसा जपत ग्राहकांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड, सोलापूरच्या नवीन ४२ व्या शाखेचा शुभारंभ गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी करमाळा येथे होणार आहे. या शाखेच्या उद्घाटन समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली असून, या निमित्ताने करमाळ्यातील व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक आणि नागरिकांसाठी बँकिंग सुविधांचे नवे दालन खुले होणार आहे.
करमाळा शहरातील सर्व्हे क्रमांक ३२९/१, शहा (जवळेकर) हॉस्पिटलशेजारी, मेन रोड येथे बँकेची नवीन शाखा सुरू होत आहे. गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत संचालक मा. नानासाहेब जाधव यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत तसेच पंढरपूरचे जिल्हा संचालक डॉ. रमेशजी सिद उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे आणि शाखा व्यवस्थापक गणेश उंबेळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच बँकेचे संचालक सीए गिरीश बोरगांवकर, सौ. चंद्रिका चौहान, सीए आनंद करंदवडे, ॲड. मल्लिनाथ शहाबादी, राजेश पवार, सौ. गौरी आंबेकर, सुरेश चिकलकी, अमित आपटे, पुरुषोत्तम उडता, डॉ. हर्षल डंबळ, महादेव न्हावकर, चरणसिंग चौहाण, रवींद्र साळुंके, प्रमोद भुतडा आणि विष्णू मोढे यांची उपस्थिती लाभणार आहे.
सोलापूर जनता सहकारी बँकेने ग्राहकांचा विश्वास संपादन करत बँकिंग क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. करमाळा शहरात १९ नोव्हेंबर रोजी नवीन शाखा सुरू होत असल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी, उद्योजक तसेच विविध क्षेत्रांतील ग्राहकांना बँकेच्या सेवांचा लाभ घेणे अधिक सोयीचे होणार आहे. बँकेच्या विस्ताराच्या दृष्टीनेही ही शाखा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या उद्घाटन समारंभास करमाळा शहर व तालुक्यातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.


