Monday, April 21, 2025
Latest:
Uncategorizedकरमाळासकारात्मक

करमाळा तालुक्यातील कात्रज येथील पंकज यादवच्या लघुपटाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद कलाक्षेत्रात करमाळा तालुक्याचा सन्मान

करमाळा प्रतिनिधी. करमाळा तालुक्यातील कात्रज येथील पंकज पांडुरंग यादव या युवकाने 2018 साली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर लहानपणापासून पासून कलाक्षेत्राची आवड असल्याने कला क्षेत्रातच करियर करायचं ठरवलं.
ग्रामीण भागातील असल्यामूळे सुरवातीला त्या क्षेत्रात उतरल्यानंतर खूप साऱ्या अडचणी आल्या पण जिद्द ठेवून हिम्मत न हरता हळू हळू काम चालू ठेवले. .त्यानंतर वेस्टन नावाचा लघुपटाचे दिग्दर्शन केले त्या लघुपटाचे पुणे इंटरॅशनल शॉर्ट फिल्म साठी निवड झाली. प्रोफेशनल सूत्रसंचालन ही चालू केले.
लता भगवान करे संघर्षगाथा,गोंधळी,आधारवड या मराठी चित्रपटांसाठी सहा.दिग्दर्शक म्हणून काम केले.माझी काळी का असेना पण ती धोकेबाज नाय या साजन बेंद्रे यांनी गायलेल्या गाण्याला दिग्दर्शन केले हे गाणं सध्या संगीत मराठी या चॅनेलवर चालू आहे.
कोविड-19 मूळे जे काही लोकांचे गैरसमज होते ते निघण्यासाठी कोरोनाच्या जनजागृती म्हणून काही व्हिडिओ बनवले.त्याचीच दखल वर्ल्ड रेकॉर्ड ने घेतली व वर्ल्ड रेकॉर्डने प्रमाणपत्र देऊन पंकज यादवचा गौरव करण्यात आला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group