करमाळा कृषी बाजार समितीचे मा. सभापती स्व. रमणलाल दोशी. यांचे शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य प्रेरणादायी प्रा.शिवाजीराव बंडगर

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती स्व. रमणलाल भाईचंद दोशी यांना बाजार समितीच्या मुख्य इमारतीत त्यांच्या प्रतिमेचं पूजन केले. त्यांना अभिवादन करून विद्यमान सभापती. प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी बाजार समितीच्यावतीने श्रद्धांजली वाहिली. या वेळी श्रंध्दाजलीपर विचार व्यक़्त करताना प्रा.शिवाजीराव बंडगर म्हणाले की, रमणभाई दोशी हे 1984 ते 1987 असे तीन वर्षे करमाळा बाजार समितीचे सभापती होते. त्यांनी या काळात शेतकऱ्याचे हित सांभाळले व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला त्यांचे हे योगदान संचालक मंडळ विसरू शकत नाही. या प्रसंगी बाजार समिती चे संचालक मयुर दोशी, वालचंद रोडगे, शशिकांत केकान, हमाल पंचायत चे प्रतिनिधी तालुका काॅग्रेस कमिटी चे नेते सुनील सावंत, त्याचप्रमाणे फारूक जमादार,पत्रकार नासीर कबीर ,सचिव सुनील शिंदे व कर्मचारी उपस्थित होते
