मस्साजोग गावचे लोकनियुक्त सरपंच कै. संतोष पंडितराव देशमुख यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनासाठी प्रा. रामदास झोळसर यांची भेट
करमाळा प्रतिनिधी मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे लोकनियुक्त सरपंच कै. संतोष पंडितराव देशमुख यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाल्यानंतर, त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी व त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी, दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची मस्साजोग गावी जाऊन भेट घेतली. सदर घटना ही श्री. शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र राज्यास अशोभनीय आहे . ह्या हत्या प्रकरणात राजकीय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध केलेल्या पुराव्यांची पोलीस यंत्रणेने दखल घ्यावी, अशी आशा प्रा. झोळ सरांनी व्यक्त केली, व या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून ही केस फास्टट्रॅक कोर्टामार्फत कारवाई करून संबंधित आरोपींना कठोरात कठोर लवकर शिक्षा व्हावी, जेणेकरून परत अशा घटनांची कोठेही पुनरावृत्ती होऊ नये, असे मत प्रा. झोळसर यांनी व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी म्हणून जोपर्यंत कै. संतोष पंडितराव देशमुख यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या सोबत राहू. त्यांच्या मुलांना काहीही शैक्षणिक अडचणी आल्यास मी व माझी संस्था तत्परतेने लागेल ते सहकार्य करू, अशी ग्वाही प्रा. रामदास झोळ सर यांनी दिली.