Monday, April 21, 2025
Latest:
करमाळा

सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांचा उत्तराखंडच्या सुर सरस्वती पुरस्काराने सन्मान

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब नरारे यांना उजागर रंग महोत्सव डेहराडून (उत्तराखंड) यांच्याकडून दिला जाणारा यावर्षीचा “सूर सरस्वती अवार्ड” देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संगीताचार्या श्रीमती मेखला दास गिरी जर्मनी, श्रीमती शोभा शितोळे पुणे, डॉ पंकज नामसुदरा गुवाहाटी, संगीताचार्य हरिराम बोराह गुवाहाटी, धनंजय कुकरेती डेहराडून इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात विद्यालयातील रोहित दळवी, संध्या जाधव, आर्यन अडसूळ , ओंकार पवार, निखिल वाघमारे , महेश वीर, प्रणिती माकुडे, स्वयम गांधी इत्यादी विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. तसेच इंडियन ह्युमिनिटी फाउंडेशन आणि पंथी जनकल्याण समिती ऋषिकेश यांच्या वतीने आयोजित केलेल्या श्रीरस महोत्सव 2022 या महोत्सवा मध्ये सुद्धा “श्री रस संगीत शिरोमणी अवार्ड” नरारे यांना प्रधान करण्यात आला.या पुरस्काराबद्दल तालुक्यातून सुरतालचे प्राचार्य नरारे सर यांचे अभिनंदन होत असून विदया विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड सर , डॉ बाबूराव हिरडे , डॉ महेशचंद्र वीर , पत्रकार दिनेश मडके , दिगंबर पवार सर , सुजीत बागल , संतोष पोतदार , विजय बाबर यांनी अभिनंदन केले आहे .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group