स्नेहालय इंग्लिश स्कूलमध्ये गुरूपौर्णिमा साजरी
करमाळा प्रतिनिधी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वुरः।गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
अर्थ गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. एवढेच नव्हे, तर ते साक्षात् परब्रह्म (ईश्वराचा ईश्वर) आहेत. असे उदगार स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्द्यार्थ्यांनी गुरू पौर्णिमेच्या कार्यक्रमाप्रसंगी काढले होते. तसेच माझ्या आयुष्यात आले मला मार्गदर्शन प्रत्येक वेळी करता माझ्या सोबत कायम असता अशा श्रीगुरूंना मी नमस्कार करतो.श्री गुरुभ्यो नमःगुरुपोर्णिमेच्या शुभेच्छा विद्द्यार्थ्यांनी शिक्षकांना दिल्या होत्या. यावेळी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी,सहशिक्षिका सीमा कोरडे,शिवांगी शिंदे,हेमा शिंदे,राधा बगडे,पल्लवी माळवे , फरहान खान,कोमल बत्तीशे , अंजुम कांबळे, सविता पवार आदिजण उपस्थित होते
