श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नपुर्णा योजनेस सहकार्य करुन वाढदिवस साजरा करण्याचा साळुंके कुंटुंबाचा आदर्श घ्यावा – गणेश भाऊ चिवटे
करमाळा प्रतिनिधी श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नपुर्णा योजनेस सहकार्य करुन वाढदिवस साजरा करण्याचा साळुंके कुंटुंबाचा आदर्श घ्यावा वाढदिवस तर सगळेच साजरे करतात, पण आपण ज्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय आदर्शवतच आहे असे मत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यानी व्यक्त केले. जिल्हा माध्यमिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद साळुंके सर यांचे चिंरजीव शुभनीत मुंकुद साळुंके यांचा वाढदिवस श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नपुर्णा योजनेतुन जेष्ठ अबाल वृध्द अपंग निराधारांना मिष्ठान भोजन देऊन सामाजिक बांधलिकीच्या भावनेतुन सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी मुकुंद साळुंके सर,पत्रकार जयंत दळवी,सौ.राणीताई साळुंके मॅडम,पत्रकार आशपाक सय्यद,अलीम शेख दिनेश मडके उपस्थित होते. अनाथ, गरीब, गरजू लोकांसाठी त्यांच्या दोन वेळच्या जेवणासाठी आर्थिक स्वरूपाची जी देणगी देवून त्यांच्या उदरनिर्वाहाचे महान कार्य केले आहे, त्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोतच. त्या सर्व लोकांच्या अंतकरनातून आप्ल्यासाठी निघालेले शुभ आशीर्वाद आपले पुढील आयुष्य सुख-समृद्धीने व्याप्त होईल. याची खात्री असल्याचे गणेश चिवटे यांनी सांगितले.
