करमाळा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यालयाचे उद्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचे हस्ते उद्घाटन… उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्त आमदार संजयमामा शिंदे कार्यालयाचा उपक्रम


करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1 जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली असून त्याचे ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2024 अशी आहे .सदर अर्ज भरत असताना महिलांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावरती पर्याय म्हणून आमदार संजयमामा शिंदे यांचे पुढाकारातून तहसील कार्यालयाच्या आवारात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे कार्यालय सुरू करण्यात येत असून या कार्यालयाकडून सदर योजनेचे ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज विनाशूल्क भरून दिले जाणार आहेत.
या कार्यालयाचे उद्घाटन उद्या दिनांक 22 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता तहसीलदार सौ.शिल्पा ठोकडे यांचे हस्ते होणार असून यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी जाधव व उमेद अभियान चे श्री योगेश जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील महिलांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय करमाळा यांचे वतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील विविध गावातील अंगणवाडी सेविकांनी ऑफलाईन अर्ज भरले असतील व ते ऑनलाईन नोंदवायचे राहिले असतील तर असे अर्जही या कार्यालयात जमा केल्यास ते विनाशुल्क ऑनलाइन भरून दिले जाणार आहेत . आमदार संजयमामा शिंदे यांच्या या कार्यालयामुळे महिलांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group