Friday, August 7, 2026
Latest:
करमाळा

सोगाव (उंदरगाव )मधील निकत परिवारातील दोन सख्खे भाव एकाच वेळी एमबीबीएस डॉक्टर पदवी परीक्षा उत्तीर्ण

करमाळा प्रतिनिधी उंदरगाव तसेच पूर्व सोगाव मध्ये रहिवासी असलेल्या निकत परिवारातील श्री लक्ष्मण शिवदास निकत याच्या दोन्ही मुलांनी डॉ माधव लक्ष्मण निकत व डॉ.केशव लक्ष्मण निकत एकाच वेळी एम बी बी एस पदवी प्राप्त करून गावात एक आदर्श निर्माण केला आहे. या दोन्ही मुलांनी बारावी झाल्यानंतर 2018 साली रशियामध्ये प्रवेश घेतला. रशियामध्ये सहा वर्षाचा कोर्स पूर्ण करून त्यानंतर भारतामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन यांची एक परीक्षा असते.या परीक्षेसाठी साठी दिल्लीमध्ये सहा महिने तयारी केली. 12 जानेवारीला ती परीक्षा देऊन काल 20 तारखेला सायंकाळी त्याचा निकाल लागला आणि या परीक्षेत ही दोन्ही भावंड चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण होऊन भारतीय सर्टिफिकेट मिळवून पुढील शिक्षण व डॉक्टर प्रॅक्टिस करण्यास पात्र झाले आहेत. या प्रवासामध्ये त्यांना त्यांच्या आई वडील, आजी आजोबा, नातेवाईक,मित्रपरिवार शिक्षक या सर्वांचे सहकार्य लाभले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!