Sunday, November 15, 2026
Latest:
Uncategorized

पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून कमलादेवी मंदिराच्या विकासासाठी दोन कोटी मंजूर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती शिफारस

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा देवीचा माळ येथील कमला भवानी देवी मंदिरासमोरील भव्य गार्डन उभा करणे त्याचे सुशोभीकरण करणे राजे राव रंभा निंबाळकर यांच्या समाधीची नूतनीकरण करणे या कामासाठी दोन कोटी दहा लाख रुपये मंजूर झाले असून हे  काम लवकर सुरू होणार असल्याची माहिती
शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोड यांनी दिली आहेशिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून या कामासाठी शंभूराजे देसाई यांच्याकडे मागणी करण्यात आली होती
कमला भवानी देवीचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ चिवटे सचिव अनिल उर्फ आबा पाटील एडवोकेट शिरीष लोणकर राजनशेठ राठोड
आदरणीय याचा पाठपुरावा केला होतापर्यटन खात्यामार्फत हा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडे वर्ग करण्यात आला असून
कामाला आता विशेष गती मिळणार आहे.श्री कमला भवानी देवी मंदिर करमाळ्यातील जागृत देवस्थान असून संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो फक्त या देवीच्या दर्शनासाठी करमाळा येथे येत असतात
विधानसभेच्या प्रचारासाठी करमाळ्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री कमला भवानी मंदिराला मदत देण्याची घोषणा केली होती
++++

महाराष्ट्र शासनाने कमलादेवी मंदिराच्या परिसर विकासासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत याचे सर्व भक्तातून स्वागत होत असून
आमच्या मागणीला यश आली आहे याबद्दल समाधान असल्याचे मत ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी व्यक्त केले आहे
+++

error: Don\'t try to copy. Content is protected !!