नंदन प्रतिष्ठान गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश क्षीरसागर, तर उपाध्यक्षपदी दीपक देवकर*
करमाळा प्रतिनिधी नंदन प्रतिष्ठान गणेशोत्सव समितीच्या आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी प्रकाश क्षीरसागर, तर उपाध्यक्षपदी दीपक देवकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यासह उत्सव शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश क्षीरसागर व उपाध्यक्ष दीपक देवकर यांचे प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष तथा भाजप सरचिटणीस जितेश कटारिया आणि समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले. आगामी गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी अमोल रोकडे , हनुमंत मस्तूद, डॉ.दुधे,निलेश माने,नितीन व्हटकर गुरुजी,बाळासाहेब वाघ,महेश क्षिरसागर,सचिन चव्हाण,अक्षय परदेशी,सचिन कुदळे, सोनू डुकले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते..


