ऐन सणासुदीमध्ये पाण्याच्या टंचाईने नागरिक हैरान प्रशासनाचा ढिम्म कारभार नगरपालिकेने नागरी सुविधा न दिल्यास आंदोलन करण्याचा नगरसेविका सौ. स्वातीताई फंड यांचा इशारा
करमाळा प्रतिनिधी ऐन सणासुदीमध्ये पाण्याच्या टंचाईने नागरिक हैरान झाले असुन प्रशासनाचा ढिम्म कारभार असल्यामुळे नागरिकांना नागरी सुविधेपासुन वंचित रहावे लागत असुन पाण्याचा प्रश्न ताबडतोब मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका सौ.स्वातीताई फंड यांनी दिला आहे.करमाळा नगरपालिकेवर सध्या प्रशासक असल्यामुळै नगराच्या सुविधेबाबत नगरसेवक व प्रशासन यांच्यात सुसंवाद नसल्याने मुख्याधिकारी प्रांत अधिकारी यांचे नागरी सुविधा देण्याकडे दुर्लक्ष होत असुन त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.सध्या पावसाळयाच्या दिवसात पाणी टंचाई,शहरात असणारी अस्वच्छता गटारीच्या कडेला वाढलेली झाडेझुडपे त्यामुळे गटारीच्या स्वच्छता न करता आल्यामुळै तुंबलेल्या गटारी महावीर उद्यान, गणेशनगर शाहुनगर,कृष्णाजीनगर,या भागातील बागेत झाडझुडपे वाढल्याने साप विंचु यांचै भय असुन रोगराई होण्याची परिस्थिती असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असुन याबाबत प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन नागरी सुविधा न दिल्यास तसेच उजनी धरण शंभर टक्के पुर्ण भरूनही करमाळा शहराला पाणी नगरपालिका पाणी पुरवठा करु शकत नाही हे मोठे दुर्दव असुन धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती असुन पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवुन पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास करमाळा नगरपालिकेवर आंदोलन करण्याचा इशारा सौ.स्वातीताई फंड यांनी दिला आहे.
