खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सुचनेनंतर केम ते टेंभुर्णी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू ग्रामस्थांनी मानले आभार
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील केम येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आढावा बैठक घेतली होती. यावेळी केम ग्रामस्थांनी केम – दहिवली – उपळवाटे ते टेंभुर्णी रस्त्याची दुरवस्था झालेली व्यथा मांडली होती. त्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने काम सुरू करायला सांगितले त्यानंतर बांधकाम विभागाने ते काम तातडीने सुरू केले असून याबाबत केम ग्रामस्थांनी याबाबत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले आहेत.
