Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडी

श्री.आदिनाथ व मकाई साखर कारखाना चालू करण्यासाठी देशाचे नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे आघाडीचे सर्वतोपरी सहकार्य लाभणार- दिग्विजय बागल.

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातीलआदिनाथ सहकारी साखर कारखाना व मकाई सहकारी साखर कारखाना सहकार क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपणारे मंदिर आहे. हे साखर कारखाने व्यवस्थित सुरळीत चालवण्यासाठी देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी सहकार्य करण्याचे ठरविले असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे महाविकास आघाडीच्या शासनाच्या सहकार्याने आदिनाथ व मकाई साखर कारखाने सुरळीत सुरू होऊन पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होईल असे मत मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय प्रिन्स बागल यांनी व्यक्त केले आहे. 9 संप्टेबर रोजी मुबंई येथे श्री आदिनाथ सहकारी साखर व मकाई सहकारी साखर कारखान्याच्या नियोजनासाठी आणि कारखानाने व्यवस्थित सुरु करण्यासाठी मुबंई येथे स्पेशल बैठक घेतली. आदरणीय शरद पवारसाहेब यांनी यावेळी दोन्ही सहकारी साखर कारखाने चालू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील साहेब, सहकार आयुक्त शेखर गायकवाड साहेब, करमाळा तालुक्याच्या स्वभिमानी नेत्या रश्मी दिदी बागल, मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिग्विजय भैय्या बागल, बाजार समितीचे संचालक सुभाष आबा गुळवे, मकाईचे साखर कारखान्याचे एमडी हरिशचंद्र खाटमोडे उपस्थित होते. दोन्ही कारखान्याचा हंगाम यशस्वीपणे यावर्षी चालण्यासाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. यातून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे हित जपणारे आदिनाथ सहकारी साखर कारखाना व मकाई सहकारी साखर कारखान्याचे यंदा सुरू करण्यात येणार असल्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या ऊसाचा प्रश्न आपले सर्व प्रश्न मार्गी लागणार आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group