करमाळासहकार

आदिनाथ मकाई सहकारी साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासनामार्फत मदत करणार- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

करमाळा प्रतिनिधी स्वर्गीय दिगंबरराव बागल मामांच्या जयंतीनिमित्त कृषी प्रदर्शनाचे आयोजन हा उपक्रम स्तुत्य असुन मामांचा वारसा रश्मी दीदी बागल दिग्विजय बागल यशस्वीपणे चालवत शस्वीपणे चालवत आहे ही मुले धडपड करणारी आहेत आदिनाथ मकाई जरी अडचणीत असले तरी हे दोन्ही साखर कारखाने अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासनामार्फत मदत करणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले लोकनेते दिगंबरराव बागल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी महोत्सवाच्या आज (रविवारी) चौथ्या दिवशी पालकमंत्री विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे विधान परिषद आमदार . रणजितसिंह मोहिते पाटील, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुुुुुमरे सर राज्य साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप, आदिनाथचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे आदी उपस्थित होते.
मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी सुरुवातीला तालुक्यातील आदिनाथ आणि मकाई या सहकारी साखर कारखान्याला सरकारने मदत करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने आदिनाथ कारखाना यावर्षी सुरु झाला. मात्र आता हे कारखाने व्यवस्थित सुरु रहावेत म्ह्णून सरकारकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर विखे पाटील यांनी कारखान्याला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले. सहकारी साखर कारखानै टिकले पाहिजे यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group