Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

वांगीच्या रस्त्याच्या संदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या समवेत घेतली बैठक . रस्त्याचा प्रश्न सामोपचाराने मिटवणार – आमदार संजयमामा शिंदे .

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील वांगी नं.3 येथील शेलगांव – ढोकरी रस्त्याच्या संदर्भात करमाळा तालुक्याचे आ.संजयमामा शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे वांगी नं . 3 येथील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती .सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आ.संजयमामा शिंदे , उपजिल्हाधिकारी शमा पवार , प्रांतअधिकारी ज्योती कदम , जिल्हा पुनर्वसन अधिकारी तांबे , तहसीलदार समीर माने , पुनर्वसन चे जाधव , माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी , ॲड . कमलाकर विर , पप्पू उकिरडे , संजय आंबोले , धनंजय मोरे , वांगी नं . 3 येथील शेतकरी गणेश रोकडे , महेश रोकडे , धनंजय रोकडे , सचिन रोकडे , माजी ग्रामपंचायत सदस्य रामलिंग खोचरे , आप्पासाहेब डोके , प्रवीण शिंदे गुरुजी , दिलीप यादव , विजय जगताप आदी उपस्थित होते .
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना सदर शेतकरी मोबदला मिळण्याकरिता पात्र आहेत का ? असा अहवाल प्रांताधिकारी आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना सादर करण्याच्या सूचना दिल्या . तसेच आठवड्याभरात जे कायदेशिर विषय प्रलंबित आहेत , ते मार्गी लावून सर्व बाबी तपासून निर्णय घ्यावा लागणार आहे . आमदार संजयमामा शिंदे यांनी सामोपचाराने प्रश्न सोडवा , असे आवाहन करत वांगी नं 3 येथील शेतकऱ्यांच्या प्रश्न संदर्भात सकारात्मक विचार करावा असे सांगितले .
यावेळी वांगी चे शेतकरी धनंजय रोकडे यांनी पर्यायी जमीन देण्याची मागणी केली . पुनर्वसन मध्ये पर्यायी जमीन मिळाली नाही , धरणात व गावठाणात आठ एकर जमीन गेली असतानासुद्धा , आजपर्यंत मोबदला मिळाला नाही .राहण्यासाठी पुनर्वसन मध्ये प्लॉट मिळावा आणि रस्त्यासाठी जमीन संपादित करून मोबदला मिळावा अशी मागणी करत, दोन वेळा आमच्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे , त्यामुळे ह्या वेळेस सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्या समोर रोकडे यांनी मांडली .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group