पांगरे ग्रामपंचायतीच्यावतीने दारूबंदीचा ठराव इतरांनी आदर्श घेण्याची गरज
करमाळा प्रतिनिधी पांगरे, ता. करमाळा येथे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, पांगरे ग्रामपंचायतीने गावात Be positive आपला गाव ठेवू कोरोना Negative हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानिमीत्ताने गावातील प्रत्येक कुटुंबास एक सुरक्षा कीट स्वनिधीतून कोरोना बाबतचे शासनाचे नियमांचे पालन करुन वाटप करण्यात आले. सदरचे कीट मध्ये सॅनिटाइज़र बाटली, ४ नग ट्रिपल लेयर मास्क, साबण, माहितीपत्रक या गोष्टीचा समावेश आहे. या सुरक्षा कीटचे वाटप करताना मास्क, साबण व सॅनिटाज़र याचा वापर व महत्व गावातील नागरिकांना पटवून सांगण्यात आले. कोरोना पासून बचाव हाच उपाय आहे. कोरोनाची भिती बाळगू नये व कोरोना पासून दुर कसे रहावे व कुटुंबाची कशी काळजी घ्यावी या बाबत ग्रामस्थांना अवगत करणेत आले. नियमीत हात धुवा सुरक्षित अंतर ठेवा, मास्कचा वापर करा, गरज नसताना घराबाहेर पडू नये हे सांगताना समाजा बाबतची आपली जबाबदारी हेही पटवून देण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वी पांगरे गावात कोरोना प्रतिबंध लस तीन वेळा शिबिर घेऊन 45 पेक्षा जास्त वयाचे 260 पेक्षा जास्त नागरिकांना गावा पर्यंत लस पोहच केली आहे.
सुरक्षा कीटचे वाटप करताना सरपंच ॲड. दत्तात्रय सोनवणे, उपसरपंच श्री सचिन पिसाळ, सदस्य श्री महेश टेकाळे, श्री विवेक पाटील, श्री गणेश वडणे, श्री धनंजय गायकवाड, श्री ज्ञानेश्वर गुटाळ तसेच श्री जोतिराम गाडे पाटील, श्री महेश शेळके इ. तसेच पोलिस पाटील श्री युवराज सावंत व ग्रामपंचायत कर्मचारी गोपाळ कोळी, मच्छिद्र उघडे उपस्थित होते.
