आजी माजी सैनिक कल्याणकारी मंडळाच्या पदाधिकारी निवडीस धर्मदाय आयुक्त सोलापूर यांची मान्यता
करमाळा प्रतिनिधी
आजी माजी सैनिक कल्याणकारी मंडळाच्या पदाधिकारी निवडीस धर्मदाय आयुक्त सोलापूर यांनी मान्यता दिली असुन या निवडीमध्ये या संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी अक्रूर शंकराव शिंदे यांची तर रवींद्र प्रभाकर सव्वाशे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आजी माजी सैनिक कल्याणकारी मंडळ संघटनेच्या मागील कार्यकारी मंडळाचे पंचवार्षिक मुदत संपल्याने नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यासंदर्भात 24 डिसेंबर 21 रोजी तालुक्यातील आजी-माजी सैनिकांची सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नवनियुक्त सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी बिभिषण संभाजी कन्हेरे यांची सचिवपदी तर भरत गिरंजे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी अंकुश सरडे यांची सहसचिव पदी, किरण ढेरे, धोंडोपंत घाडगे यांची संचालक पदी तर श्रीमती राणी काटे, रूपाली महामुनी यांची संचलिका म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीचा धर्मदाय आयुक्त सोलापूर यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावास धर्मदाय आयुक्त सोलापूर यांनी मान्यता दिली आहे. यावेळी तालुक्यातील आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी मंडळाचे सभासद व्हावे तसेच त्यांच्या समस्या व अडी अडचणी मंडळाच्या पदाधिकारीशी चर्चा करून सोडवाव्यात असे आवाहन सचिव बिभिषण कन्हेरे व उपाध्यक्ष रविंद्र सव्वाशे यांनी केले आहे.
